Details |
भेलके महाविद्यालयात " शांतता पुणेकर वाचत आहेत" उपक्रम
" शांतता पुणेकर वाचत आहेत" उपक्रम पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या शंकरराव भेलके महाविद्यालय, नसरापूर येथे राबविण्यात आला.यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयातील कर्मचारी तसेच विद्यार्थांनी कथा, कादंबऱ्या, चरित्रे, अभ्यासक्रमाशी निगडित पुस्तके यांचे वाचन करून सक्रिय सहभाग नोंदविला.
शिक्षण मंत्रालय,भारत सरकार, राष्ट्रीय पुस्तक न्यास, नवी दिल्ली, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, फर्ग्युसन महाविद्यालय आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे पुस्तक महोत्सव २०२४ उपक्रमाचे आयोजन दि.१४ ते २२ डिसेंबर २०२४ या कालावधीमध्ये फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे येथे करण्यात आले आहे. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तकांचे स्टोल लावण्यात येणार असून भरघोस सवलतीच्या दरामध्ये चांगल्या प्रतीची नावाजलेली पुस्तके आपणांस मिळणार आहेत. याची माहिती ग्रंथपाल प्रा.भगवान गावित यांनी सर्व उपस्थित विद्यार्थी यांना दिली.
महाविद्यालयातील सर्व विद्यार्थांनी एक पुस्तक वाचून त्याचा सेल्फी किंवा फोटो दिलेल्या लिंकवर अपलोड करून सदर उपक्रमामध्ये सहभागी व्हायचे आहे तसेच महाविद्यालयातील सर्व विद्यार्थांनी पुणे पुस्तक महोत्सव मध्ये सहभागी व्हायचे आहे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.तुषार शितोळे यांनी केले.
सदर उपक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि कार्यालयातही सर्व कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. उपक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा.भगवान गावित आणि सुमित कांबळे यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.तुषार शितोळे यांच्या मागर्दर्शनाखाली केले. |